मोठ्या पगाराची सरकारी नोकरी
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई येथे होणार आहे. या पदासाठी निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग, टेक्निकल स्किल टेस्ट आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे पूर्ण केली जाणार आहे.
पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची संपूर्ण माहिती
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.lichousing.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
advertisement
पगाराबाबत बोलायचे झाले तर निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 16.50 लाख ते 19.15 लाख रुपयांपर्यंत आकर्षक पॅकेज दिले जाणार आहे. त्यामुळे ही नोकरी आयटी क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
शैक्षणिक पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास उमेदवारांकडे बी.ई. (IT/CS), एमसीए किंवा एमटेक पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच विज्ञान किंवा आयटी क्षेत्रातील पदवीधारक उमेदवारही अर्ज करू शकतात. तसेच उमेदवाराला आयटी क्षेत्रात किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
