कर्जतकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन धावताना दिसत नाहीयेत. अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे. भांडूप स्टेशनला तर नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या स्टेशनमध्ये पाणी शिरलं असून, रेल्वे रुळावर गुडघ्या इतकं पाणी आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. दुसरीकडे मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड, डेक्कनक्विन आणि पंचवटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
मुंबई आणि उपनगरांना पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे. रेल्वेच्या मध्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही ट्रेन उशिरानं धावत असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर चाकरमान्यांची गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.