TRENDING:

मुलांच्या डब्ब्याची चिंता संपली! अशा पद्धतीने बनवू शकता झटपट आप्पे, अगदी सोपी पद्धत...

Last Updated:

सुलभा बीर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लहान मुले भाज्या खायला अनेकदा नकार देतात. अशावेळी तुम्ही त्यांना याच भाज्या आप्पेच्या स्वरूपात त्यांना साऊथ इंडियन डिश म्हणून खायला देऊ शकतात. तसेच मुलेही ते आवडीने खातील. त

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : साऊथ इंडियन डिश ही प्रत्येकाला आवडते. यामध्ये इडली डोसा, उतप्पा हे पदार्थ अनेकांचे आवडते पदार्थ आहेत. पण यासोबत रव्याचे आप्पे हेसुद्धा अनेकांना आवडतात. अनेकदा मुलांना डब्ब्यात रोज काय द्यावे, असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. त्यात रोज भाजी, चपाती खाऊन मुले कंटाळून जातात. म्हणून अशावेळी मुलांच्या टिफीनमध्ये झटपट होणारे रव्याचे आप्पे तुम्ही तयार करुन देऊ शकतात. तर मग आज आपण हेच रव्याचे आप्पे नेमके कसे तयार करतात, याचीच सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

advertisement

सुलभा बीर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, लहान मुले भाज्या खायला अनेकदा नकार देतात. अशावेळी तुम्ही त्यांना याच भाज्या आप्पेच्या स्वरूपात त्यांना साऊथ इंडियन डिश म्हणून खायला देऊ शकतात. तसेच मुलेही ते आवडीने खातील. तसेच सकाळच्या धावपळीत मुलांना शॉर्ट ब्रेक टिफिन म्हणूनही तुम्ही रे रव्याचे आप्पे देऊ शकतात.

advertisement

साहित्य :-

बारीक रवा 1 वाटी

दही 1/2 वाटी

शिमला मिर्च

गाजर

पनीर

कांदा

जिरी

मोहरी

तेल

कोथिंबीर

मीठ

खायचा सोडा

पाणी

ओले खोबरे 1/2 वाटी

अदरक 1/2 इंच

हिरवी मिरची 2-3

कच्चे शेंगदाणे 1/2 वाटी

फुटण्याची डाळ 3/4 वाटी

कढीपत्ता 10-12 पाने

अशी आहे कृती :-

सर्वप्रथम एक बाऊल घ्यावा. त्यात एक वाटी कच्चा रवा, एक चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घायचंय. त्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी दही व थोडंसं पाणी घालून चांगल मिक्स करून घावे. इथे पाऊण वाटी पाणी यासाठी लागते. आता हे मिश्रण 15-20 मिनिटसाठी साईडला फरमेंट होण्यासाठी ठेऊन द्यावे. तोपर्यंत आपण ह्या भाज्या फ्राय करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी घालून व भाज्या टाकाव्यात.

advertisement

दिवसभरात एका व्यक्तीने किती आहार घ्यावा?, रात्रीचं जेवणं नेमकं कसं असावं?, डॉक्टरांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती

या भाज्या दोन ते तीन मिनिटे चांगल्या फ्राय करून घ्याव्या. या भाज्या जास्त फ्राय करू नये, हे लक्षात ठेवावे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अजून स्वीट कॉर्न, कोबीचे तुकडे, हिरवे मटार अशा विविध भाज्या ॲड करू शकता. परतलेल्या भाज्या थंड होण्यासाठी साईडला ठेवून ठेवा. भाज्या थंड होईतोपर्यंत यासोबत खायला चटणी बनवून घेऊया.

advertisement

अशाप्रकारे बनवा चटणी -

यासाठी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कच्चे साल काढलेले शेंगदाणे, दोन हिरव्या मिरच्या, थोडीशी फुटाण्याची डाळ, अर्धा इंच आलं, चवीनुसार मीठ, पाणी आणि थोडीशी साखर घालून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. तुम्ही चटणीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार अॅडजस्ट करू शकता. शक्यतो चटणीही थोडीशी पातळसर ठेवावी म्हणजे आप्पेसोबत ती छान खाता येईल. ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. यानंतर या चटणीवर फोडणी करून घ्यावी. त्यासाठी इथे तडका पात्रामध्ये एक चमचाभर तेल घालावे. तेल चांगलं कडकडलं की गॅस बंद करावा. त्या तेलात एक चमचा जिरे व मोहरी, पाच-सहा कढीपत्त्याची पानं घालून ही फोडणी चटणीवर ओतावी., अशा प्रकारे ही चटणी तयार होते.

famous medu vada : स्वस्तात मस्त नाश्ता, चवही भारी, मेदूवड्याला तर लोकांची खूपच पसंती, हे आहे लोकेशन

यानंतर आतापर्यंत 15 ते 20 मिनिट झालेले असतील. तोपर्यंत रवा चांगला फुगलेला असेल. त्यामुळे आता तुम्ही गॅस ऑन करून आता त्यावर आप्पेपात्र गरम होण्यासाठी ठेवून देऊया. आप्पे पात्र गरम होईपर्यंत आपण यात थंड झालेल्या सर्व भाज्या मिक्स करून घ्या. यामध्ये एक अर्धा चमचा त्यावर थोडंसं पाणी घालावे. आता हे मिश्रण एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे. इथे आपलं आप्पेपात्र सुद्धा गरम झाले असेल. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यावे. आता हे मिश्रण सर्वप्रथम साईडला ओतून घ्यावे व नंतर मध्ये ओतून घ्यावे. आता आप्पेपात्रावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी ठेवून द्यावे.

दोन ते तीन मिनिट झाल्यावर झाकण काढून पाहावे. तुम्हाला आप्पेला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला पाहायला मिळेल. आता तुम्हाला हे आप्पे दुसऱ्या साईडने टाकायचे आहे. दुसऱ्या साईडला टाकल्यावर अजून दोन ते तीन मिनिट आप्पेपात्रावर झाकण ठेवायचे आहे. दोन ते तीन मिनिटांनंतर उघडून पाहावे. यानंतर तुम्हाा तुमचे आप्पे खाण्यासाठी रेडी झालेले दिसतील. अशाप्रकारे पटकन तयार होणारे आणि खायला पौष्टिक असे आप्पे तुम्ही तयार करू शकतात.

मराठी बातम्या/मुंबई/
मुलांच्या डब्ब्याची चिंता संपली! अशा पद्धतीने बनवू शकता झटपट आप्पे, अगदी सोपी पद्धत...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल