दरम्यान, बोगद्यात एखादी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्यासाठी हे क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात आले आहेत. या क्रॉस पॅसेजेसमुळे संपूर्ण बोगद्यातून प्रवास न करता या क्रॉस पॅसेजेसमधून एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करणे शक्य असल्याचे समोर आले आहे. कोस्टल रोडवरील प्रवासासाठी 2072 किलोमीटरचे दोन बोगदे खंदण्यात आले आहेत. 11 मीटर लांबीवर 10 क्रॉस पॅसेजेस या बोगद्यात आहेत, याची उंची साडेचार मीटर आहे. या क्रॉस पॅसेजेसमधून आपत्कालीन परिस्थतीत वाहनांना आणि प्रवाशांना बाहेर काढता येणे शक्य होणार आहे.
advertisement
बोगद्याच्या भिंती या अतिउच्च तापमान सहन करू शकतील, अशा बांधल्या आहेत. त्यामुळे एखाद्या वाहनाला आग लागल्याची घटना घडल्यास 900 सेल्सिअसपर्यंत तापमान बोगदा आणि भिंती सहन करू शकतात. बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे कॉंक्रीटचे अस्तर लावण्यात आले असून, त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाय योजनेंतर्गत अग्निरोधक फायरबोर्ड लावण्यात आले आहेत. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी ‘क्रॅश बॅरियर’ देखील उभारण्यात आले आहेत. याशिवाय प्रियदर्शनी पार्क येथील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ रूग्णवाहिका आणि इमर्जन्सी फायर ब्रिगेड व्हेईकल तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, कोस्टल रोडवर आगीची दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत म्हणून बोगद्यात 3 किमी लांबीचे फायर हायड्रंट बसवण्यात आले आहेत. अग्निशमन दल आपत्ती प्रतिसाद वाहनाचा वापर करून तत्काळ आग विझवता येईल. यासाठी प्रियदर्शनी पार्क येथे पालिकेकडून बोगद्याच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या टेक्निकल इमारतीजवळ फायर टँक बांधण्यात आले आहेत. यामध्ये सव्वाचार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे.