मोहम्मद आसिफ खान असं आत्महत्या करणाऱ्या २० वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागे आजारपणाला कंटाळून आलेल्या नैराश्याचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वांद्रे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आसिफ हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहत होता. बुधवारी (३ सप्टेंबर) त्याची आई कामानिमित्त बाहेर गेली होती, तर त्याचा भाऊ कॉलेजला गेला होता. घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
या घटनेची अधिक माहिती अशी की, मोहम्मद आसिफने मर्चंट नेव्हीचा कोर्स पूर्ण केला होता. तो एक चांगला कबड्डी खेळाडू देखील होता. पण सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेनं त्याचं आयुष्य बदलून गेलं. त्याचा अपघात झाला होता. ज्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो मानसिक तणावाखाली होता, आणि याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.