कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्यप्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09304 डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर विशेष गाडी 21 आणि 28 डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी 4:30 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 3:00 वाजता ठोकूर येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 09304 ठोकूर ते डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी 23 आणि 30 डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे 4:45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
advertisement
Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! नव्या लोकलमधून सुरू होणार प्रवास, काय मिळणार सुविधा?
याशिवाय कोकण रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने छत्तीसगडच्या बिलासपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल. गाडी क्रमांक 08241 बिलासपूर ते मडगाव एक्स्प्रेस 20 आणि 27 डिसेंबर तसेच 3 आणि 10 जानेवारी रोजी दुपारी 2:45 वाजता बिलासपूरहून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री 2:15 वाजता मडगाव येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 08242 मडगाव जंक्शन ते बिलासपूर एक्स्प्रेस 22 आणि 29 डिसेंबर तसेच 5 आणि 12 जानेवारी रोजी मडगाव जंक्शनहून पहाटे 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडे आकारणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आवडीनुसार स्थानिक सोयीस्कर मार्गे अधिक आरामदायक आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. अशा विशेष रेल्वेगाड्यांमुळे यात्रेकरूंना नववर्षाच्या सणाच्या काळात अधिक सुलभतेने प्रवास करता येईल आणि गर्दी कमी होईल.






