मुंबईतील 'या' परिसरात होणार कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील नागरिकांना 22 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 26 डिसेंबर मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणी मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून सुरू असलेल्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पाच्या कामासाठी 2400 मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला आहे. या वळवलेल्या जलवाहिनीवर क्रॉस कनेक्शन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम सलग 87 तास चालणार असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
advertisement
या कालावधीत काही भागांत पाण्याचा दाब कमी राहील तसेच नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे तसेच दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आरोग्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस पाणी उकळून गाळूनच पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
