मेट्रो मार्गिका 7 आणि मेट्रो मार्गिका 9 (पहिला टप्पा) या दोन मार्गिकांना एकत्र जोडणीचे कामं आणि अत्यावश्यक प्रणाली एकीकरण (system integration) तसंच सुरक्षा चाचण्या पार पाडण्यासाठी वरील कालावधीत सकाळच्या कालावधीत धावणाऱ्या मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे तांत्रिक कामं अंधेरी (पूर्व) ते मिरा- भाईंदरदरम्यानच्या मार्गावर म्हणजेच मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गांवर हा केले जाणार आहेत. मेट्रोच्या अशा सलग जोडणीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, लवकरच प्रवाशांना या सेवांतून अमर्याद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
advertisement
पुढील आठवडाभरसाठीचं नवं वेळापत्रक (१२ ते १८ ऑक्टोबर २०२५)
गुंदवलीला जाणारी पहिली ट्रेन
सोमवार ते शुक्रवार - सकाळी ०७:०१ तास
शनिवार - सकाळी ०७:००
रविवार - सकाळी ०७:०४
अंधेरी पश्चिमेला जाणारी पहिली ट्रेन
सोमवार ते शुक्रवार - सकाळी ०७:०६
शनिवार - सकाळी ०६:५८
रविवार - सकाळी ०६:५९
दहिसर पूर्वेकडून -
अंधेरी पश्चिमेला जाणारी पहिली
सोमवार ते शुक्रवार - सकाळी ०७:०२
शनिवार: सकाळी ०७:०२
रविवार: सकाळी ०७:०२
गुंदवलीला जाणारी पहिली ट्रेन
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ०६:५८
शनिवार: सकाळी ०७:०६
रविवार: सकाळी ०७:०१
अंधेरी पश्चिमेकडून
गुंदावलीला येणारी पहिली ट्रेन:
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ०७:०१
शनिवार: सकाळी ०७:०२
रविवार: सकाळी ०७:०४
गुंदावलीहून
अंधेरी पश्चिमेकडे येणारी पहिली ट्रेन
सोमवार ते शुक्रवार - सकाळी ०७:०६
शनिवार - सकाळी ०७:०२
रविवार: सकाळी ०७:००
मेट्रोची नियमित सेवा 19 ऑक्टोबर 2025 पासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. यासोबतच एमएमआरडीएकडून सर्व प्रवाशांना दिलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.