सरकारसमोर कायदेशीर अडचणी
मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून मान्यता देण्याबाबत न्यायालयाच्या काही निकालांमुळे कायदेशीर अडचणी येत आहेत. त्यामुळे, यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. यासाठीच 'वर्षा' निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून खलबतं सुरू होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून एक नवीन प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
महाराष्ट्रातून रसद सुरूच
न्यायमुर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर जरांगे यांनी सरकारला टोला लगावत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता गेल्या चार दिवसांपासून जोरदार आंदोलन सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आंदोलकांना रसद देखील पुरवली जात आहे.
मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी
दरम्यान, मुंबईत दाखल झालेल्या हजारो मराठा बांधवांसाठी सकाळपासून अन्नछत्रांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले मराठा बांधव हे पुन्हा आझाद मैदानाकडे जात आहे विविध ठिकाणी या मराठा बांधवांसाठी फळवाटप तसेच उपमा पोहे आणि चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद मैदानाकडे जाणाऱ्या चाफेकर बंधू चौकाच्या परिसरात ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे.