याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुलगी तिच्या घराजवळ खेळत होती. त्यावेळी ३७ वर्षीय व्यक्तीने तिला जेवणाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
भावासोबत राहत असलेल्या पत्नीला दोन मुलांसह संपवलं; क्रिकेटच्या बॅटने घेतला तिघांचा जीव
पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून फरार झालेल्या पतीला ठाणे पोलिसांनी 48 तासात अटक केली आहे. हत्या करून अमित बागडी हा पळून हरियाणाला गेला असताना त्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी अमितचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 पथके नेमली होती. त्यातील 2 पथके हरियाणाला रवाना करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक यंत्रणांचा तपास करून अमिताला हरियानाच्या इसा रेल्वे स्थानकातून अटक केली.