गौरव पाटील हा ठाण्यात राहत होता. तो पाकिस्तानमधील गुप्तचर विभागातल्या हस्तकाला माहिती देत असल्याचं दहशतवादी विरोधी पथकाला समजले होते. एटीएस पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे गौरव पाटीलला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक आणि व्हॉटसअपवरून पाकिस्तानमधील दोन हस्ताकांसोबत ओळख झाल्याचा खुलासा झाला.
advertisement
Loksabha Security Breach : संसद भवनाच्या सुरक्षेत त्रुटी, 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
पाकिस्तानी हस्तकाला माहिती देण्याच्या बदल्यात गौरवने पैसे स्वीकारल्याचं समोर आलंय. गौरव पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या तिघांविरुद्ध देशद्रोहाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे. गौरव पाटीलला अटक केली असून तिसऱ्या व्यक्तीबाबत अधिक तपास केला जात आहे.
गौरवने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नेव्हल डॉकयार्डमध्ये ६ महिने अप्रेंटेसशिपसाठी होता. त्याच वेळी त्यानं महत्त्वाची अशी माहिती शेअर केल्याचा एटीएसला संशय आहे. ठाणे परिसरात गौरव भाड्याने राहत होता. आतापर्यंत त्याने किती पैसे घेतले? कोणती माहिती शेअर केली? याचा तपास आता एटीएस करत आहेत.
