Loksabha Security Breach : संसद भवनाच्या सुरक्षेत त्रुटी, 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सभागृहात घुसखोरी केल्यानं सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या.
दिल्ली, 14 डिसेंबर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना सभागृहात घुसखोरी केल्यानं सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या होत्या. आता या प्रकरणी संसद भवनाच्या ८ सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहात प्रेक्षक गॅलरीतून उडी मारत आत स्मोक कँडल लावल्या होत्या. तर दोघांनी संसदेबाहेर घोषणाबाजी करत स्मोक कँडल पेटवल्या. या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
दरम्यान, संसद भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी प्रकरणी संसद भवनातील आठ सुरक्षा कर्मचारी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संसदेत तरुणांच्या घुसखोरीनंतर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने तातडीने पावले उचलली आहेत.
आरोपी चंदिगढमध्ये पहिल्यांदा भेटले
संसद भवनाच्या आत आणि बाहेर कट रचणाऱ्या आरोपींची सर्वात प्रथम भेट चंदीगडमध्ये झाली होती. चंदीगड येथील भगतसिंग विमानतळाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान ही बैठक झाली होती. त्यानंतर हे आरोपी अनेकदा विशालच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी भेटले. विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
advertisement
आरोपी विशालला घेतलं ताब्यात
आरोपींना वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अग्निवीर आणि वन रँक वन पेन्शनचा मुद्दा उपस्थित करायचा होता. या सहाही आरोपींमागे काही राजकीय संरक्षण आहे का? या दिशेनेही चौकशी सुरू आहे. आरोपी विशालला त्याच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेण्यात आले. आरोपी ललित झा याचा स्पेशल सेलच्या पथकाकडून शोध सुरू आहे, त्याला लवकरच अटक केली जाईल.
advertisement
उच्च स्तरीय समितीची स्थापना
view commentsसंसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली असून उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सी आर पी एफ महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या बाहेरील थराच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे असते.CRPF चे जवान शस्त्रास्त्रांसह संसद भवन संकुलात असतात. ते संसद भवनात प्रवेश करत नाहीत. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत प्रत्येक योजना इतर एजन्सींसोबत तयार करण्यात CRPF ही आघाडीची संस्था आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2023 11:10 AM IST
मराठी बातम्या/देश/
Loksabha Security Breach : संसद भवनाच्या सुरक्षेत त्रुटी, 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई


