Loksabha Security Breach Case : संसद हल्ला प्रकरण, मास्टरमाइंडबाबत समोर आली नवी माहिती
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरंजन डी हा मास्टरमाईंड असण्याची शक्यता आहे. त्याने इतरांना त्याच्या कार्यात सामील होण्यास प्रवृत्त केले होते.
दिल्ली, 14 डिसेंबर : लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक कँडलचा धूर पसरवणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या चौघांना बुधवारी अटक करण्यात आली. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. चौकशीदरम्यान, चौघांनीही खुलासा केला की, आम्हाला संसदेच्या कामकाजात शेतकरी, बेरोजगारीचा मुद्दा, मणिपूरचा मुद्दा याकडे सरकारचे लक्ष वेधायचे होते. आतापर्यंतच्या तपासात या चौघांचाही मास्टरमाईंड समोर आलेला नाही, तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोरंजन डी हा मास्टरमाईंड असण्याची शक्यता आहे. त्याने इतरांना त्याच्या कार्यात सामील होण्यास प्रवृत्त केले होते. मनोरंजनला नीलमनेच भर्ती केले होते. गेल्या वर्षी भरती झाली होती. मनोरंजनची कार्यपद्धती ही नक्षलवाद्यांसारखी असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे हे शहरी नक्षलवादाचे क्लासिक प्रकरण असल्याचं दिसतं असल्याची माहिती समजते.
advertisement
मनोरंजन त्याचा मोबाईल फोन आणि सोशल मीडिया तपशील शेअर करण्यास नकार देत आहे. संयुक्त चौकशी दिवसभर सुरू राहणार आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यामध्ये विशेष आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, 5 डीसीपी, 7 एसीपी आणि 20 हून अधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.
आरोपी चंदिगढमध्ये पहिल्यांदा भेटले
संसद भवनाच्या आत आणि बाहेर कट रचणाऱ्या आरोपींची सर्वात प्रथम भेट चंदीगडमध्ये झाली होती. चंदीगड येथील भगतसिंग विमानतळाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान ही बैठक झाली होती. त्यानंतर हे आरोपी अनेकदा विशालच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी भेटले. विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले.
advertisement
आरोपी विशालला घेतलं ताब्यात
आरोपींना वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मागण्या, अग्निवीर आणि वन रँक वन पेन्शनचा मुद्दा उपस्थित करायचा होता. या सहाही आरोपींमागे काही राजकीय संरक्षण आहे का? या दिशेनेही चौकशी सुरू आहे. आरोपी विशालला त्याच्या राहत्या घरातूनच ताब्यात घेण्यात आले. आरोपी ललित झा याचा स्पेशल सेलच्या पथकाकडून शोध सुरू आहे, त्याला लवकरच अटक केली जाईल.
advertisement
ललीतचा शोध सुरू
संसद प्रकरणातील फरार आरोपी ललित झा यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, फरार आरोपी ललितच्या हालचाली हरियाणाच्या दिशेने असू शकतात. त्यामुळे हरियाणाच्या नीमराना आणि हिस्सारमध्ये अनेक पथके छापे टाकत आहेत. स्पेशल सेलची टीम नीमरानाच्या गंडाळा गावात पोहोचली तेव्हा ललित तेथून फरार झाला. स्पेशल सेलच्या 2 टीम फक्त ललितच्या शोधात व्यस्त आहेत.
advertisement
उच्च स्तरीय चौकशीसाठी समिती स्थापन
view commentsसंसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या संवेदनशील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली असून उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी सी आर पी एफ महासंचालक अनिश दयाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या बाहेरील थराच्या सुरक्षेची जबाबदारी CRPF कडे असते.CRPF चे जवान शस्त्रास्त्रांसह संसद भवन संकुलात असतात. ते संसद भवनात प्रवेश करत नाहीत. संसदेच्या सुरक्षेशी निगडीत प्रत्येक योजना इतर एजन्सींसोबत तयार करण्यात CRPF ही आघाडीची संस्था आहे. DG CRPF अनिश दयाल, ज्यांच्याकडे DG CRPF चा अतिरिक्त कार्यभार आहे, ते ITBP चे DG देखील आहेत. याआधीही अनिश दयाल यांनी आयबीमध्ये बराच वेळ घालवला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2023 10:36 AM IST
मराठी बातम्या/देश/
Loksabha Security Breach Case : संसद हल्ला प्रकरण, मास्टरमाइंडबाबत समोर आली नवी माहिती


