नितीनला दारू पाजली
शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास आशिष जोगेश्वरी परिसरात नितीनला भेटला. दोघांनी एकत्र बसून दारू प्यायली. नितीनला त्याचा मृत्यू समोर उभा आहे याची कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष त्याला मालवणीतील कोळीवाडा भागात कृष्णा आश्रमातील एका खोलीत घेऊन गेला.
काठीने मारहाण करून हत्या
खोलीत पोहोचताच आशिषचा धीर सुटला आणि त्याने लाकडी काठीने नितीनला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. नितीनने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. मारहाणीमध्ये नितीनच्या शरिरातून इतकं रक्त सांडलं की त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला
हत्येनंतर सहसा गुन्हेगार पळून जातात किंवा त्यांचा गुन्हा लपवतात. पण या प्रकरणात, आशिष स्वतः थेट मालवणी पोलीस ठाण्यात गेला. त्याने तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली. 'साहेब, मी माझ्या बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे, मला अटक करा.' हे ऐकून पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या सगळ्यांना धक्का बसला.
आशिषच्या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नितीनला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्येत वापरलेली लाकडी काठी खोलीतून जप्त करण्यात आली आहे. तसंच शवविच्छेदनानंतर नितीनचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आशिषने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. न्यायालयाने त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत.
