बघता बघता एक एक किलो मिटर अंतर पार करत मराठा बांधव मुंबईत पोहोचलेच. मुंबईत आल्यानंतर ठरल्याप्रमाणे आझाद मैदानात मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली आहे. आझाद मैदान परिसर मराठा बांधवांनी फुलून गेला आहे. जिकडे नजर जाईल तिकडे मराठा बांधवांची गर्दी झाली आहे. आझाद मैदान हे पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यम आणि मराठा बांधवांशी संवाद साधला. आता ही शेवटची फाईट आहे, असं म्हणून त्यांनी आंदोलनाचं पुढचं चित्र स्पष्ट केलं. जरांगेंच्या भाषणानंतर आझाद मैदानामध्ये एका मराठा बांधवाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, वेळीच तिथे उपस्थितीत असलेल्या इतर लोकांनी त्याला रोखलं. ही बाब, मनोज जरांगे यांना समजली. 'जर आता कुणी अजून काही असा प्रकार केला तर मी उपोषण सोडून देत असतो बघा' असं म्हणत सगळ्यांना इशारा दिला.
advertisement
दुकानं, हॉटेल सगळेच बंद का ठेवले? जरांगेंचा सवाल
'मुंबईला पोलीस बंदोबस्ताला आहे. त्यांना त्रास द्यायचा नाही. इथं आल्यावर शौचालयाची व्यवस्था केली आहे. पण तेही बंद केली. चहा आणि वडापावचे दुकानं होती तेही बंद केली. त्यामुळे सीएसटीवर पोरं बसली होती. आता पाणी प्यायला जागाच नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांना सांगितलं. मग तुम्ही इंग्रजापेक्षाही बेकार झाले. पोरांना पाणी दिलं नाही, जेवायला त्रास झाले, असं असतं का, आम्ही तुमचे पाहुणे आहोत, पाव्हण्यासोबत असं कुणी करतात का, आमच्या गावाला येऊन बघा पाव्हण्यासोबत आम्ही असं करतो का. आमच्या मराठा बांधव हे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळ्याच पक्षातले आहे. मुंबईला अशी वागणूक दिली जर हे गावी घेऊन मराठा बांधव गेले तर आमदार आणि खासदारांचीही आम्ही अशी सोय करू. तुमच्या सभा होतील तेव्हा आम्ही अशीच वागणूक देऊ, सरकारने जर आठमुठेपणाने वागले तर काही खरं नाही' असा इशाराही जरांगेंनी दिला.