या घटनांमुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामावर जाणाऱ्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शहरातील विविध भागांतून अशा तक्रारी येत आहेत, ज्यात कुत्रे अचानकपणे रस्त्यावर येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना चावा घेत आहेत. चावा घेतलेल्यांमध्ये काहींना मोठी जखम झाली असून, त्यांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत. रुग्ण रुक्मिणीबाई रुग्णालय आणि इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
advertisement
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होते. कुत्र्यांचे कळप रस्त्यांवर फिरताना दिसतात काही कुत्रे अचानक हल्ला करतात. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटते आहे. या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी नागरिक महानगरपालिकेकडे करत आहेत.
गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, पिस्तुलीबद्दल पोलिसांनी मोठी माहिती
कित्येक ठिकाणी अशा घटना घडत असल्या तरी महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. रोजच्या कामात, दैनंदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांवर अचानक भटक्या कुत्र्यांचा हल्ला होत आहे. जोपर्यंत यावर प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत ही समस्या वाढतच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येवर त्वरित लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, अशी अपेक्षा कल्याणकरांनी प्रशासनाकडून केली आहे.