बीएमसी बिल्डिंगच्या समोर अंघोळ
मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी झाली आहे. तिथंच मराठा आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू असताना आता एका मराठा आंदोलकाने चक्क बीएमसी बिल्डिंगच्या समोर अंघोळ केल्याचं समोर आलं आहे. सर्वांसमोर अंघोळ करून या तरुणाने जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा पाठिंबा दर्शविला आहे.
advertisement
मराठा आरक्षण आंदोलनासाठी लाखोंच्या संख्येने मराठा तरुण आंदोलक मुंबईकडे कुच करीत आहेत. रात्रभर प्रवास करून झाल्यावर ट्रॅफिक जाम झाल्यानंतर सकाळी रस्त्याच्या कडेलाच गावाकडून आणलेला स्वयंपाकाचा शिधा मुंबईचा वेशीवर तयार करून सकाळचा नाष्टा रस्त्याच्या कडेला करून घेतला.
जरांगेंच्या आंदोलकांना सुचना
दरम्यान, आपण आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. आता मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. प्रत्येक माणसानं ड्राईव्हरला फोन लावायचा आणि सांगायचं की पोलिस सांगतील तिथं जाऊन गाडी लावायची. मग ते कितीही लांब असू देत. एकही गाडी रोडवर राहता कामा नये. आपण सर्वांनी मुंबईत जाम केली ना.. आता दोन तासात मुंबई मोकळी करायची जबाबदारी पण आपली आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.