मुंबई हायकोर्टामध्ये आज मराठा आंदोलनावर सुनावणी सुरू होती, यावेळी मराठा बांधवांनी कोर्टाच्या परिसरात गर्दी केली होती. गुणरत्न सदावर्ते सुद्धा कोर्टामध्येच होते. सुनावणी संपल्यानंतर काही मराठा बांधवांनी सदावर्ते यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच सगळ्यांना आडवलं. सदावर्ते यांना भेटू नका अशी विनंती करत मागे पाठवलं. मराठा आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी मराठा बांधवांना मनाई केली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
advertisement
....म्हणून सदावर्तेंना भेटायचं होतं!
दरम्यान, मराठा आंदोलकांना जेवढं बदनाम करायचं तेवढं बदनाम केलंय. आम्ही कोणत्याही महिलेची, आया बहिणीची छेड काढली नाही. आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले असेल तर दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे. आम्ही कधीच कोणत्याही आया बहिणीची छेड काढली नाही. जर कुणी असं केलं असेल तर आम्हाला इथंच गोळ्या झाडा, आम्ही आमच्या हक्काच्या मागणीसाठी, पोरं बाळांच्या भविष्यासाठी इथं आलो होतो. आम्ही गुणरत्न सदावर्ते यांना भेटण्यासाठी आलो होतो. त्यांनी मराठा समाजाबद्दल कोर्टामध्ये जे काही मांडलं त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे होते. इतके मराठा समाजाचे मोर्चे झाले, पण आमचा एक गुन्हा दाखवा. आमच्या आंदोलकांनी एकाही माय माऊलीची छेड काढली असेल, दुकानावर दगड मारला असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहोत, असं मराठा बांधवांनी ठणकावून सांगितलं.