दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षानं घटनास्थळी आले होते. त्यानंतर ते सिद्दिकी यांची वाट पाहात त्याच ठिकाणी थांबले. जेव्हा सिद्दिकी हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी आले, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातील दोन गोळ्या सिद्दिकी यांच्या छातीला लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तीन आरोपींव्यतिरिक्त अन्य एका आरोपीचा देखील या गोळीबारात सहभाग आहे. या तीन आरोपींना बाबा सिद्दिकी यांच्याबाबत माहिती पुरवण्याचं काम या आरोपीनं केलं आहे. सिद्दिकी यांच्या लोकेशनची माहिती देखील याच आरोपींनी इतर तीन जणांना सांगितल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान मागीत अनेक दिवसांपासून बाबा सिद्दिकी यांच्या मागावर हे आरोपी होते, संधी मिळताच त्यांनी गोळीबार केला अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वीच बाब सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र धमकीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिद्दिकी यांचा घात झाला. आरोपी गेल्या 15 दिवसांपासून सिद्दिकी यांच्यावर पाळत ठेवून होते.