TRENDING:

ठाणे-घाटकोपर ते थेट नवी मुंबई विमानतळ, गेमचेंजर प्लॅनची तयारी, कुठून कुठं धावणार मेट्रो?

Last Updated:

Mumbai Metro: मुंबई महानगर विकास प्राधिकरण गेमचेंजर प्लॅनच्या तयारीत आहे. ठाणे-घाटकोपर ते थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत मेट्रो धावणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो मार्गिका अधिक प्रभावीपणे एकमेकांशी जोडण्यासाठी सिडकोने मोठे नियोजन सुरू केले आहे. विशेषतः मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यान अखंड मेट्रो सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वर्तुळाकार पद्धतीचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासोबतच ठाणे ते नवी मुंबई विमानतळ असा वेगळा मेट्रो मार्ग (M-22) उभारण्याबाबतही एमएमआरडीए प्राथमिक अभ्यास करत आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
ठाणे-घाटकोपर ते थेट नवी मुंबई विमानतळ, MMRDA गेमचेंजर प्लॅनच्या तयारीत, कुठून कुठं धावणार मेट्रो?
ठाणे-घाटकोपर ते थेट नवी मुंबई विमानतळ, MMRDA गेमचेंजर प्लॅनच्या तयारीत, कुठून कुठं धावणार मेट्रो?
advertisement

घाटकोपरमध्ये मेट्रो 4 मेट्रो 8 चे जोडणी केंद्र

पूर्व उपनगर तसेच ठाण्याकडील प्रवाशांना थेट विमानतळ मेट्रो वापरता यावी यासाठी घाटकोपर परिसरात मेट्रो 4 आणि मेट्रो 8 यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गिरोडीया नगर परिसरात स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग तयार करून हा संगम साधता येऊ शकतो.

Mira Bhayander Metro : तारीख ठरली! मिरा- भाईंदर मेट्रो होणार सुरू; कसा असेल मार्ग

advertisement

सागर संगमावर महत्त्वाची मेट्रो कडी

कल्याण–भिवंडी मेट्रोचा विस्तार तळोजापर्यंत करण्याचा विचार असून तळोजाहून उलवे येथील ‘सागर संगम’पर्यंत सिडकोची मेट्रो 1 वाढवून ती थेट मेट्रो 8 शी जोडता येईल, असा आराखडा समोर आला आहे. यामुळे कल्याण, भिवंडी, तळोजा, खारघर अशा भागांतून नवी मुंबई विमानतळापर्यंत सहज पोहोच सुनिश्चित होईल.

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ : स्वतंत्र मार्गिकेचा पर्याय

advertisement

ठाण्यावरून विमानतळाकडे जलद मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी भविष्यात ‘ठाणे–नवी मुंबई विमानतळ’ असा स्वतंत्र मार्ग विकसित करण्याचाही सिडकोचा विचार चालू आहे. सध्या ठाणे–घाटकोपर–विमानतळ असा मार्ग शक्य असला तरी स्वतंत्र मार्गिकेमुळे प्रवास अधिक वेगवान होईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जिथं रक्त सांडलं, तिथंच फिरवला बुलडोझर, छ. संभाजीनगरात धडक कारवाई, Video
सर्व पहा

या संपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सिडकोने राज्य सरकारकडे सादर केला असून मंत्रिमंडळाची मंजुरी लवकर मिळण्याची चिन्हे आहेत. वाढत्या प्रवासी भाराचा विचार करता आणि दोन्ही विमानतळांना प्रभावी मेट्रोने जोडण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
ठाणे-घाटकोपर ते थेट नवी मुंबई विमानतळ, गेमचेंजर प्लॅनची तयारी, कुठून कुठं धावणार मेट्रो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल