Mira Bhayander Metro : तारीख ठरली! मिरा- भाईंदर मेट्रो होणार सुरू; कसा असेल मार्ग
Last Updated:
Mira-Bhayander Metro : मिरा-भाईंदर मेट्रो लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रोचे पूर्ण मार्ग, स्थानके आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा याची माहिती जाहीर झाली आहे.
मुंबई : मिरा-भाईंदर करांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे.
'या' मेट्रोमार्गाचा फायदा मिळणार या परिसरातील नागरिकांना
तब्बल 14 वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन 2009 मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे . मंत्री सरनाईक म्हणाले कि, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदर वासीय मेट्रो ने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो 1 चा वापर करून एअरपोर्ट स्थानक 3 मधून थेट कुलाबापर्यंत देखील जाऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई तील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्क द्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.
advertisement
डिसेंबर 2026 अखेर मेट्रो सुभाष चंद्र बोस मैदानापर्यत
दहिसर - काशिमिरा ही मेट्रो ही डिसेंबर 2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे . त्याबरोबरच वसई- विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई- विरार पासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक ते थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केलं.
advertisement
दहिसर - काशिमीरा मेट्रोला हिरवा कंदील
view commentsदहिसर ते काशिमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन येईल. अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 2:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Bhayander Metro : तारीख ठरली! मिरा- भाईंदर मेट्रो होणार सुरू; कसा असेल मार्ग


