नवी मुंबईचं 'उडता पंजाब' करणाऱ्यांना खाकी वर्दीचा दणका, मोठी अद्दल घडवली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नवी मुंबई पोलिसांनी पंजाब ते नवी मुंबई असा सक्रिय असलेला अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा महत्त्वाचा दुवा नष्ट केला आहे
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने पंजाबपर्यंत पोहोचणारे अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे. या कारवाईत तब्बल 1 कोटी 35 लाख 90 हजार रुपये किंमतीचा उच्च प्रतीचा हेरॉईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे. या कारवाईमुळे नवी मुंबईतील ड्रग्सच्या अवैध नेटवर्कला मोठा झटका बसला आहे.
advertisement
वाशीतील कोपरी गाव परिसरात अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. अशा मिळालेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर 2025 रोजी कोपरी गावातील परशुराम पाटील बिल्डींग मध्ये राहणाऱ्या विक्रमजितसिंग अमरीकसिंग व्यक्तीच्या घरी ठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपीच्या ताब्यातून 271.8 ग्रॅम वजनाचा हेरॉईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत बाजारभावानुसार 1,35, 90,000 रुपये इतकी आहे. आरोपी हा अंमली पदार्थ पंजाब येथून आणून नवी मुंबईत आपल्या ओळखीच्या लोकांना विक्री करत होता. त्यासाठी तो रोख तसेच गुगल पेच्या माध्यमातून रक्कम स्वीकारत असल्याचे उघड झाले आहे.
advertisement
अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा महत्त्वाचा दुवा नष्ट
एपीएमसी पोलीस ठाणे येथे आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६७६/२०२५ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ (सी) आणि २१ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमुख पुरवठादारांसह एकूण ७ पाहिजे आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर आरोपीला न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
advertisement
या कारवाईमुळे नवी मुंबई पोलिसांनी पंजाब ते नवी मुंबई असा सक्रिय असलेला अंमली पदार्थ पुरवठा साखळीचा महत्त्वाचा दुवा नष्ट केला आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईसारख्या सुशिक्षित, सधन भागात नशेचा बाजार सुरू असल्याचे पुन्हा एकदा या कारवाईतून स्पष्ट झाले.
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
November 20, 2025 9:28 PM IST


