'त्याला कोणी ओळखणारही नाही', शाहरुखबद्दल हे काय बोलून गेला विवेक ओबेरॉय? राज कपूरबद्दल म्हणाला...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Vivek Oberoi on Shah Rukh Khan: अभिनेता विवेक ओबेरॉय याने शाहरुखच्या स्टारडमच्या भविष्यावर एक मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान याची लोकप्रियता केवळ देशातच नाही, तर जगभरात आहे. त्याच्या नावावर 'सुपरस्टार' चा शिक्कामोर्तब झालेला असताना, अभिनेता विवेक ओबेरॉय याने शाहरुखच्या स्टारडमच्या भविष्यावर एक मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर शाहरुखच्या चाहत्यांमध्ये आणि बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विवेक ओबेरॉयने बदलत्या पिढीची आवड आणि पुराणमतवादी स्टारडम कशा प्रकारे बदलत आहे, यावर आपले मत मांडले. "रणबीर कपूरचे जे चाहते आहेत, त्यांना कदाचित हे माहीतही नसेल की त्यांचे आजोबा राज कपूर कोण होते. आपण त्यांना सिनेमाचा देव मानतो, पण रणबीर कपूरचे तरुण चाहते त्यांना ओळखतही नसतील," असे विधान विवेकने केले.
advertisement
विवेकच्या मते, पिढी बदलल्यावर लोकांची आवड आणि निवड बदलते आणि त्यामुळे स्टारडमचे महत्त्वही बदलते. विवेक ओबेरॉयच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र वादविवाद सुरू झाला आहे. एका बाजूला विवेकचे समर्थक त्याच्या वास्तववादी बोलण्याला पाठिंबा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शाहरुख खानचे चाहते त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत.
advertisement


