परीक्षा पुढे ढकलल्याने नाराज झालेल्या परीक्षांर्थींचा प्रश्न
परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आमदार अभिमन्यु पवार यांना उद्देशून वास्तव मांडणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आयबीपीएस परीक्षेचं कारण पुढे करून राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली खरी पण खरंच 258 जागा आहे त्या जाहिरातीत एड करता येणार आहेत का? तसंच आयबीपीएस आणि राज्यसेवा अशा दोन्ही परीक्षांना विद्यार्थी वर्ग आहे कितीसा? मग केवळ 'कृषी'च्या काही हजार परीक्षार्थींच्या दबावापोटी अडिच लाख परीक्षार्थींचं भवितव्य पुन्हा टांगणीला का? आंदोलक आणि राजकीय दबावापोटी एमपीएससीच्या स्वायत्तेवरच घाला घातला जातोय का? वर्षभरात वेळापत्रक जाहिर होऊनही एमपीएससीची एकही परीक्षा होऊ शकलेली नाही, असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. परीक्षा लांबल्याने परीक्षांर्थींचे वेळापत्रक कोलमडलं, खर्चही सोसवेना, विरोधात बोललं तर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो म्हणून निनावी पत्र व्हायरल केल्याचं बोललं जातंय.
advertisement
MPSC वार्षिक वेळापत्रक
राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
संयुक्त पूर्व - 16 जून 2024
गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
एमपीएससीच्या नियोजित वेळाकपत्रकातनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 28 एप्रिलला होणार होती. ते पुढे ढकलून 21 जुन करण्यात आली. ती परीक्षा पुढे ढकलून 25 ऑगस्ट करण्यात आली. आत्ता कृषी विभागाच्या जागा समाविष्ठ करण्यासाठी 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे जाऊ शकते, अशी चर्चा चालू आहे.
वाचा - विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके! आठवलेंचा मित्रपक्षांना इशारा
पुढील 2 महिन्यातील परीक्षा वेळापत्रक:
31 ऑगस्ट IBPS PSB CLERK
1 सप्टेंबर UPSC CDS
7 सप्टेंबर गणपती बाप्पा आगमन
8 सप्टेंबर सध्या रिकामा
9 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर SSC CGL
20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर UPSC CSE मुख्य परीक्षा
29 सप्टेंबर IBPS RRB SCALE 2 & 3
5 ऑक्टोबर सध्या रिकाम
6 ऑक्टोबर IBPS RRB OFFICE ASSISTANT
12 ऑक्टोबर दसरा
13 ऑक्टोबर IBPS PSB CLERK MAINS
19 ऑक्टोबर IBPS PO PRE
20 ऑक्टोबर IBPS PO PRE
20 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागेल मग त्यात काय वेळापत्रक असेल निवडणुकीच ते आताच सांगता येत नाही.