ज्योती मल्होत्रा गणेश गल्लीतही गेली होती. गणेशोत्सवात लालबागचा राजा आणि गणेश गल्लीत हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या दोन्ही गर्दीच्या ठिकाणी ज्योतीनं व्लॉग केला होता. यामुळे आता तपास यंत्रणांचं टेन्शन वाढलंय. ज्योतीनं व्ल्हॉगच्या बहाण्यानं रेकी करून ही सर्व माहिती आयएसआयला पाठवल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
ज्योती मल्होत्रानं मुंबईचा दौरा कधी केला होता?
advertisement
- कर्णावती एक्सप्रेसने करिश्मानं मुंबईला पहिली भेट दिली होती.
- ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबादहून मुंबईला कर्णावती एक्सप्रेसनं तिने प्रवास केला होता.
- त्यानंतर पंजाब मेलनं दुसऱ्यांदा प्रवास केला होता.
- सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून ज्योती मुंबईला आली होती.
- लक्झरी बसनं तिने मुंबईला तिसरी भेट दिली होती.
- जुलै 2024 मध्ये ज्योती लक्झरी बसनं मुंबईला पोहोचली होती.
- 2023 मध्ये गणेश चतुर्थी दरम्यान ज्योती मुंबईत आली होती.
राजाला झालेल्या गर्दीचे व्हिडीओ ज्योतीनं कुणाला पाठवले?
गणेशोत्सवात लालबागच्या राजाला झालेल्या गर्दीचे व्हिडीओ ज्योतीनं कुणाला पाठवले याचा तपास सुरू करण्यात आलाय. लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि सीएसटीचे ज्यातीने व्हिडीओ काढल्यामुळे गांभीर्य प्रचंड वाढलंय.ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं आगळीक केल्यानंतर कोणत्या शहरात किती वाजता ब्लॅक आऊट केला जायचा ही अत्यंत संवेदनशील माहितीही ज्योतीनं आयएसआयला दिली होती.इतकंच नव्हे तर काश्मीरच्या काजीगुंड या महत्त्वाच्या ठिकाणीही ज्योतीने गरजेपेक्षा मोठा व्हिडीओ तयार करून पाकिस्तानला मदत केली होती, असं आता बोललं जातंय.
देशभरात रेकी करणाऱ्या ज्योती मल्होत्रानं मुंबईचीही रेकी केल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोका वाढलाय. परिणामी ज्योतीला मुंबईत कुणी मदत केली, मुंबईतल्या स्लीपर सेलची तिला मदत झाली का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित झालेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रानं जानेवारी महिन्यात पहलगामला भेट दिली होती आणि 22 एप्रिल रोजी पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला होता. ज्योती मल्होत्रा पाकिस्ताची गुप्तहेर असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे ज्योतीनं देशभरात केलेले सर्वच व्लॉग संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत व्ल्हॉगच्या बहाण्यानं रेकी करून ज्योतीनं सर्व संवेदनशील माहिती आयएसआयपर्यंत पोहोचवल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणांसह मुंबई पोलीसही अलर्ट झाले आहेत.