मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या कालावधीत फलाट क्रमांक 16 व 17 वर पायाभूत सुविधा बळकट करणे, संरचनात्मक सुधारणा, विद्युत यंत्रणेशी संबंधित कामे तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर फलाटांवरून गाड्यांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
Mumbai News : सकाळच्या घाईत भीषण अपघात; एकापाठोपाठ एक तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळावर कोसळले
advertisement
ब्लॉक कालावधीत RLDA कडून काम पूर्ण होऊन फलाट वाहतुकीसाठी सुपूर्द होईपर्यंत कोणतीही मेल किंवा एक्सप्रेस गाडी फलाट क्रमांक 16 व 17 वर ये-जा करणार नाही. परिणामी काही अप मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या अंतिम स्थानकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
1 फेब्रुवारी 2026 पासून पुढील आदेश येईपर्यंत अमरावती–CSMT एक्सप्रेस (12112), बल्लारशाह–CSMT नांदिग्राम एक्सप्रेस (11002), हावडा–CSMT एक्सप्रेस (12810), भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस (11020), बिदर–CSMT एक्सप्रेस (22144), लातूर–CSMT एक्सप्रेस (22108) तसेच मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस (22120) या गाड्या दादर स्थानक येथे अल्पकालीन थांब्यावर संपविण्यात येणार आहेत. तसेच मंगळुरू–CSMT एक्सप्रेस (12134) ही गाडी ठाणे स्थानक येथे अल्पकालीन थांब्यावर संपविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, हे ब्लॉक रेल्वे पायाभूत सुविधांच्या दीर्घकालीन विकासासाठी अत्यावश्यक आहेत. CSMT च्या पुनर्विकासामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक आधुनिक, सुरक्षित व सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या कालावधीत प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते. मात्र प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.






