मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवर बंदी आणली होती. तो निर्णय आताही कायम ठेवला आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजेवर बंदी यंदाही गणेशोत्सवात कायम राहणार आहे. गणेशोत्सव काळात डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळावर मुंबई पोलिसांची नजर असणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्या मंडळाकडून या आदेशांचे उल्लंघन होईल त्यावर कडक कारवाई केली जाईल.
advertisement
मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वर्षांपासून डीजे आणि डॉल्बी सिस्टीमवर बंदी कायम ठेवली आहे. ही बंदी केवळ गणेशोत्सवासाठीच नाही, तर इतर सर्व सार्वजनिक मिरवणुका आणि सणांसाठी लागू आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मुंबईत डीजे वाजवण्यास कायद्याने परवानगी नाही.
अनेक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्यं, जसे की ढोल-ताशा पथकं, लाईव्ह बँड किंवा कमी आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत असतात. आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जातेय. डीजेचा मोठा आवाज मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा मुद्दा पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा न्यायालयासमोर मांडला आहे. यामुळे ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.