अलीकडेच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन लोकल दाखल झाली असून मध्य रेल्वेला देखील एक एसी लोकल मिळणार आहे. या माध्यमातून जानेवारी 2026 पासून प्रत्येकी 10 ते 12 एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. नवीन एसी लोकल चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएसफ) मुंबईत दाखल झाल्या असून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. नवीन एसी लोकलमुळे सध्याच्या एसी लोकलवरील भार काहीसा कमी होण्यास मदत होईल. सध्या, पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 9 एसी लोकल आहेत. तर मध्य रेल्वेकडे सुद्धा 8 ते 10 एसी लोकल असल्याची माहिती आहे. आता सध्या रेल्वेकडून लोकलच्या ताफ्यांमध्ये एसी लोकल वाढवताना दिसत आहे.
advertisement
9 जून 2025 रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन लोकल गाड्या एकमेकांना घासल्यामुळे काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ज्यात एका पोलीस कर्मचार्याचा समावेश होता आणि १४ जण जखमी झाले होते. या अपघातानंतर मध्य रेल्वेकडून एसी लोकलच्या संख्यांमध्ये वाढ करण्याचा जोर वाढत आहे. शिवाय, साध्या लोकलला ही ऑटोमॅटिक डोअर लावण्याची मागणी रेल्वे मंडळाकडून प्रयत्न केले जात आहे. लवकरच आता या सर्व लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. शिवाय, रेल्वे प्रशासनाकडून एसी लोकलच्या तिकिटांमध्येही कपात केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
