मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीपासून पाच तास पीएनआर कॉम्प्रेशनसह स्थिर आणि गतिमान प्रणालीची देखभाल केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रांवरील सर्व सेवा बंद राहणार आहे. यामध्ये प्रवासी आरक्षण, तिकीट रद्द करणे, रिफंड, करंट बुकिंग, चार्ट डिस्प्ले, टच स्क्रीन, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल यांचा समावेश आहे. आज रात्री 11.45 वाजेपासून ते सोमवारी पहाटे 5.45 पर्यंत आरक्षण प्रणाली बंद राहील.
advertisement
इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण नाही
दरम्यान, या काळात इंटरनेटद्वारेही तिकीट आरक्षण होणार नाही. त्यामुळे प्रवाशांना या काळात अडचणी येऊ शकतात; त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तिकीट रद्द केल्यास विद्यमान नियमांनुसार टीडीआर जारी केला जाईल, असेही रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वेने प्रवाशांना या आवश्यक कामासाठी सहकार्य करण्याचे आणि प्रवासाची योजना आखताना वेळेचा विचार करण्याचे आवाहन केले आहे.