असं असेल वेळापत्रक
गाडी क्रमांक 09051 ही दादर-भुसावळ त्रै-साप्ताहिक विशेष गाडी 30 जूनपर्यंत मर्यादित होती. आता या गाडीचे वेळापत्रक 3 जुलैपासून 29 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आले आहे. ही गाडी आता दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी दादरहून भुसावळकडे धावणार आहे.
ST Fare: लालपरीचा प्रवास आजपासून स्वस्त, आता फुल तिकीट वाल्यांना सवलत, काय आहे नवी योजना?
advertisement
गाडी क्रमांक 09052, भुसावळ-दादर त्रै-साप्ताहिक विशेष गाडी सुद्धा याच कालावधीत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी भुसावळहून दादरकडे धावेल. या दोन्ही विशेष गाड्यांची प्रत्येकी 39 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, एकूण 78 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक होते. त्यातच पावसाळ्यात नियमित गाड्यांवर ताण येतो. त्यामुळे या अतिरिक्त फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेत होण्यास मदत होणार आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.