TRENDING:

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी 'या' भागांत 22 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

Last Updated:

Mumbai Water Cut: बृहन्मुंबई महानगरपालिकेची जुनी तानसा, नवीन तानसा आणि विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. 22 तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बृहन्मुंबई महानगरपालिकेची 1200 मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, 1200 मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि 800 मिलिमीटर व्यासाच्या विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील 300 मिलिमीटर, 600 मिलिमीटर आणि 900 मिलिमीटर व्यासाच्या एकूण पाच झडपा बदलण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. हे काम शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत (एकूण 22 तास) सुरू राहणार आहे. त्यामुळे या 22 तासांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्याच पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
Navi Mumbai Water Cut: नवी मुंबईकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्याच पाणीबाणी, या भागात पुरवठा बंद
advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी जुनी आणि नवीन तानसा जलवाहिनी तसेच विहार ट्रंक मुख्य जलवाहिनीवरील एकूण पाच झडपा (चार बटरफ्लाय झडप आणि 1 स्लुईस झडप) बदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम शुक्रवार, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून शनिवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांतील एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर या चार प्रशासकीय विभागात काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

advertisement

प्रभावित विभागांचा तपशील

  • एन विभाग- (दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 03:45 मिनिटांपासून सकाळी 8 वाजेपर्यंत)
  • परिसर- राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, ओ. एन. जी. सी. वसाहत, रेल्वे कर्मचारी वसाहत, आर. एन. गांधी मार्ग.

  • एल विभाग (दिनांक दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत) परिसर-न्यू टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रस्ता, शिवसृष्टी रस्ता, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस वसाहत, कसाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एवरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जेवण चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर.
  • advertisement

  • एम पश्चिम विभाग (दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत) परिसर- टिळक नगर, टिळक नगर स्थानक रस्ता, पेस्टम सागर रस्ता क्रमांक 1 ते 6, ठक्कर बाप्पा वसाहत पाडा क्रमांक 1 ते 4, शास्त्री नगर, वत्सलाताई नाईक नगर, सहकार नगर, शेल कॉलनी, इंदिरा नगर, एस. जी. बर्वे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, पश्चिम बाजूकडील सेवा मार्ग (प्रगती सोसायटी), गोदरेज वसाहत, यशवंत नगर, सम्राट अशोक नगर, राजा मिलिंद नगर, आदर्श नगर, भक्ती पार्क, अजमेरा वसाहत, एम. एम. आर. डी. ए. एस. आर. ए. वसाहत.
  • advertisement

  • एफ उत्तर विभाग (दिनांक 15 नोव्हेंबर रोजी पहाटे 03:45 मिनिटांपासून सकाळी 8 वाजेपर्यंत) परिसर- शीव (सायन) पश्चिम आणि पूर्व, दादर पूर्व, माटुंगा पूर्व, वडाळा, चुनाभट्टीचा काही भाग, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, अल्मेडा कंपाउंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सोडा विल्डिंग्ज (नवीन कफ परेड), शीव कोळीवाडा-सरदार नगर, संजय नगरचा काही भाग, गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबा मिठागर, वडाळा, भीमवाडी येथील प्रवेशद्वार क्रमांक 4 आणि 5.
  • advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी 'या' भागांत 22 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल