TRENDING:

VIDEO: नालासोपाऱ्यात तरुणांमध्ये तुफान राडा, भररस्त्यात दोन गटांनी एकमेकांना धू-धू धुतलं

Last Updated:

पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड परिसरात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी नालासोपारा : पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड परिसरात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. दोन गटांनी भररस्त्यात एकमेकांना बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे बुधवारी रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भर रस्त्यावर जोरदार मारामारी झाल्याने काही काळ परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आचोळे रोड परिसरातील बेडेकर गल्लीजवळ काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीने या वादाला सुरुवात झाली होती. पण हा वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही गटांतील तरुण एकमेकांना धक्काबुक्की व मारहाण करू लागले. अचानक रस्त्यावर सुरू झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात उपस्थित लोकांची गर्दी जमली.

या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन गट एकमेकांना मारहाण करत आहेत आणि आजूबाजूचे लोक तसेच काही नागरिक त्यांना सोडवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दोन्ही गटातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

advertisement

गर्दीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारे तरुणांकडून गोंधळ घालण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या व्हायरल व्हिडिओची नालासोपारा पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO: नालासोपाऱ्यात तरुणांमध्ये तुफान राडा, भररस्त्यात दोन गटांनी एकमेकांना धू-धू धुतलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल