महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली
या स्पर्धेत चौधरी यांनी दमदार प्रदर्शन करत सलग अनेक कुस्त्या जिंकल्या आणि प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या कुस्त्या पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. चौधरींच्या प्रत्येक डावावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या तडफदार खेळामुळेच येणाऱ्या 15 ते 20 जानेवारी 2026 दरम्यान सातारा येथे होणाऱ्या हिंदकेसरी स्पर्धेसाठी त्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
स्पर्धेनंतर बोलताना एसीपी विजय चौधरी म्हणाले, पोलिासांचे हे माझं कर्तव्य असलं तरी खेळ हे माझं आयुष्य आहे. महाराष्ट्र पोलिस दलाचं नाव देशभर उज्ज्वल ठेवणं हा माझा ध्यास आहे. हिंदकेसरी किताब महाराष्ट्र पोलिस दलाच्या नावावर करण्यासाठी मी सर्वस्वाने प्रयत्न करणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस दलातील सहकाऱ्यांनीही चौधरींवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
एसीपी विजय चौधरींची ही निवड केवळ कुस्ती क्षेत्रासाठी नव्हे तर महाराष्ट्र पोलिस दलासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. कर्तव्य आणि खेळ यांचा उत्कृष्ट समतोल साधणारे चौधरी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. आगामी हिंदकेसरी स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पुन्हा एकदा सुवर्णकामगिरी करतील अशी अपेक्षा राज्यभरातील क्रीडाप्रेमी करत आहेत.
