पनवेल–कळंबोली या मार्गावर अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर हा ब्लॉक लागू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत काही मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार एकूण 16 मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर या ब्लॉकमुळे परिणाम होणार आहेत.
advertisement
ब्लॉकचे तपशील पुढीलप्रमाणे
18 जानेवारी रोजी मध्यरात्री 1:20 ते 3:20,
25 जानेवारी रोजी 1:20 ते 5:20,
3 फेब्रुवारी रोजी 1:20 ते 4:20,
10 फेब्रुवारी रोजी 1:20 ते 3:20,
तसेच 12 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:00 ते 4:00 या वेळेत ब्लॉक राहणार आहे.
DFCCIL प्रकल्पासाठी उभारण्यात येणारा ओपन वेब गर्डर तब्बल 110 मीटर लांबीचा असून त्याचे वजन सुमारे 1500 मेट्रिक टन आहे. एवढ्या मोठ्या आणि अवजड गर्डरची उभारणी एकाच वेळी शक्य नसल्याने ती कामे मध्यरात्रीच्या ब्लॉकमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. या कालावधीत काही गाड्या रद्द न करता विलंबाने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेषतः 3 लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या कालावधीत लांब पल्ल्याचा प्रवास करणार असतील तर संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आवश्यक त्या सूचना वेळोवेळी जाहीर केल्या जातील असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.






