त्या दिवशी नेमकं घडलं तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरला पलाश प्रेम आणि त्याचे तिघे मित्र अलिबागला फिरायला गेले होते. गुगल मॅपमधील लोकेशनचा वापर करून ते अलिबाग कोर्टाजवळील एका किनाऱ्यावर पोहोचले. समुद्रकिनारी गेल्यानंतर सर्वांनी पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला पण समुद्राच्या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. ज्यात पलाशचा मित्र शशांक खोल पाण्यात अडकला. शशांक घाबरुन मदतीसाठी ओरडून लागल्याने पलाश हा थेट समुद्रात त्याला वाचवण्यासाठी गेला. पण दुर्देवाने पलाश आणि शशांक त्या खोल समुद्रात दिसेनासे झाले.
advertisement
आईच्या डोळ्यात आजही आशेचा दिवा
सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ स्थानिकांना सांगितले. यानंतर यानंतर पोलिस, कोस्टल गार्ड्स, एनडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली. ज्यात 3 नोव्हेंबर रोजी शशांकचा मृतदेह मिळाला पण पलाशचा काही पत्ता लागला नाही. पलाशच्या शोधासाठी स्पीडबोट, सर्च टीमच्या मदतीने आसपासचा संपूर्ण परिसर तपासण्यात आला तरीही पलाशचा काहीही ठावठिकाणा मिळालेला नाही.
गेला 1 महिना झाला असला या घटनेला तरीदेखील पलाशचे आई-वडील आशा सोडत नाहीत. पलाश समुद्रात उतरला तो जीव वाचवण्यासाठी. त्यामुळे कदाचित एखाद्या किनाऱ्यावर त्याला मदत मिळाली असेल तो सुरक्षित असेल असे त्याचे वडीलांना वाटत आहे. त्यांनी गेल्या महिनाभरात अनेक वेळा अलिबागला जाऊन शोधकार्याची माहिती घेतली आहे. रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्ग, अलिबागसह सर्व किनारी भागांतील पोलीस, स्थानिक मच्छिमार आणि स्वयंसेवी संघटनांशी संपर्क साधला आहे.
घरातील एकुलता एक मुलगा
एमबीए-टेकचे शिक्षण घेणारा पलाश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे घरातील फोन वाजला की, कदाचित पलाशची काही माहिती मिळाली असेल असे त्याच्या आई-वडिलांना वाटते. कोणीतरी दरवाजाची बेल वाजवली की ,कदाचित पलाशच असेल म्हणून त्याची आई घाईघाईने दरवाज्याकडे धावते. पलाशबाबत कुणाकडे कोणतीही माहिती असल्यास त्वरित अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
