कधी आणि कुठं ब्लॉक
9 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावाजवळील साखळी क्रमांक 120.300 तसेच धोत्रा गावाजवळील साखळी क्रमांक 125.400 या ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. त्यानंतर 10 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे येथील खंबाळा गावाजवळील साखळी क्रमांक 130.400 येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद राहील.
advertisement
12 जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक 145.200 येथे नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाचोड गावाजवळील साखळी क्रमांक 140.500 येथे नागपूर वाहिनीवरील वाहतूकही दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
13 जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर येथील देऊळगाव परिसरातील साखळी क्रमांक 150.300 येथे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच त्याच दिवशी शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक 145.200 येथेही मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक बदलाची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस आणि महामार्ग प्रशासनाकडून सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार आहे.






