TRENDING:

काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये मुंबई पोलिसांची एक नंबर कलाकारी, Video पाहून म्हणाल भारीच!

Last Updated:

वेगवेगळ्या पेंटिंग्जने भरलेलं हे स्टॉल सध्या काला घोड्याला भेट देणाऱ्या सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतंय. कारण हे सगळे पेंटिंग्ज मुंबई पोलिसांनी काढलेले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : मुंबईतील काला घोडा आर्ट फेस्टिव्हलचे 25 वे वर्ष यंदा आहे. या आर्ट फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन आणि स्टॉल पाहायला मिळतील. इथे अगदी ज्वेलरीपासून ते कपड्यांपर्यंत सगळ्यांचे स्टॉल आहेत आणि यासोबतच इथे आणखी एक स्टॉल आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वेगवेगळ्या पेंटिंग्जने भरलेलं हे स्टॉल सध्या काला घोड्याला भेट देणाऱ्या सगळ्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतंय. कारण हे सगळे पेंटिंग्ज मुंबई पोलिसांनी काढलेले आहेत. मुंबई पोलीसमध्ये असणाऱ्या काही जणांनी मिळून ही कलाकारी केली आहे. ज्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

advertisement

या चित्रांमध्ये फ्लेमिंगो पासून ते निसर्गचित्रांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी फ्लेमिंगो चित्रांना विशेष पसंती मिळाल्यामुळे यंदा हे चित्र काढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या या पेंटिंग प्रदर्शनाचे हे 15 वे वर्ष आहे. जुनी मुंबई कशी होती याचे चित्र देखील काढलेले आहे. ज्यामध्ये मुंबईतील जुन्या चाळींचे बारकाईने चित्र रेखाटलेले आहे.

महाराष्ट्रातील पहिलाच तृतीपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा, पुण्यात 5 खास जोडपी लग्नबंधनात!

advertisement

विकास लवंडे, रमेश चोपडे आणि संकेत राठोड यांच्या चित्रांचं प्रदर्शन इथे मांडण्यात आलंय. रमेश चोपडे यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं सुंदर चित्र रेखाटलंय. या चित्राला अनेकांची पसंती मिळत आहे. हे चित्र पाहताना हुबेहूब आपण अंबाबाईच्या महालक्ष्मीलाच पाहतोय असं वाटतं.

'मी कोल्हापूर वरून फक्त काला घोडा आर्ट फेस्टिव्हल पाहण्यासाठी आलो आहे. फेस्टिव्हलमध्ये फिरताना मुंबई पोलिसांनी काढलेल्या चित्रांचा स्टॉल मला दिसला म्हणून मी पाहायला आलो तर त्यांनी काढलेले हे महालक्ष्मीचे चित्र पाहून मी थबकलोच. इतकं सुंदर चित्र काढलंय की खरंच साक्षात महालक्ष्मीच समोर आहे असंच वाटतंय, असे तिथे चित्र पाहणाऱ्या महेश महापूजी यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये मुंबई पोलिसांची एक नंबर कलाकारी, Video पाहून म्हणाल भारीच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल