कसा उघडकीस आला हा प्रकार?
काशिमीरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी महामार्गालगत असणाऱ्या टार्जन डान्सबारवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना बारमध्ये दोन गुप्त तळघर (secret cavities) सापडली. ही तळघरं इतकी चलाखीने बनवली होती की, बाहेरून शोधणं जवळपास अशक्य होतं.
सिक्रेट रुमची गुंतागुंतीची यंत्रणा
पहिल्या तळघराचा दरवाजा एका काचेच्या भिंतीमागे लपवलेला होता, जो आतून बंद केल्यावर बाहेरून उघडता येत नव्हता. दुसऱ्या तळघराचा दरवाजा तर आणखीच गुंतागुंतीचा होता. तो उघडण्यासाठी इलेक्ट्रिक बोर्डवरील तीन पिनचा प्लग लावून बाजूचं बटण दाबल्यावर जोरदार लाथ मारल्यावरच दरवाजा उघडत होता.
advertisement
अशा या गुप्त तळघरांचा वापर बारबालांना पोलिसांच्या नजरेपासून लपवण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी या दोन्ही तळघरांचा शोध घेतला आणि त्यामध्ये लपलेल्या 5 बारबालांना बाहेर काढले. याशिवाय, बारमध्ये काम करणाऱ्या आणखी 12 बारबालांचीही पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा अवैध बारवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.