TRENDING:

जोगेश्वरीत वीट पडून 22 वर्षीय तरुणी मृत्यू प्रकरणी दोन अभियंत्यांना अटक

Last Updated:

जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जोगेश्वरीमध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणाऱ्या २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याचे ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
News18
News18
advertisement

स्थानिकाने No Bail Only Jail अशी मागणी तानिकाकडून करण्यात येत आहे. विकासाकावर कारवाई व्हायलाच पाहिजे अन्यथा हा तर ट्रेलर होता मग विकासाला पूर्ण पिक्चर दाखव.. या घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनिवारी पोलिसांनी साईट अभियंता शंभू कुमार पलट पासवान ( २९) आणि गौरव दिनेशभाई सोनडगर ( ३९) या दोघांना अटक केली. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तपास सुरू असून या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

advertisement

काय आहे प्रकरण? 

जोगेश्वरी पूर्व येथील मजासवाडी परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. या इमारतीमधून वीट खाली पडून २२ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अखेर कडक पाऊल उचलत इमारतीचा विकासक, ठेकेदार आणि सुपरवायझर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी ८ ऑक्टोबरला सकाळी घडली होती. मृत तरुणी आपल्या कामावर जात असताना, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून अचानक एक वीट तिच्या डोक्यात पडली. वीट लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

advertisement

निष्काळजीपणामुळे एका तरुणीचा जीव गेला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

या घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजनांची येथे अंमलबजावणी केली गेली नव्हती, अशी माहिती समोर आली. शिवाय बांधकामाच्या ठिकाणी खाली जाळी किंवा अन्य सुरक्षेचे उपाय नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झालं. विकासक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीचा जीव घेतला, असे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मेघवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
जोगेश्वरीत वीट पडून 22 वर्षीय तरुणी मृत्यू प्रकरणी दोन अभियंत्यांना अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल