TRENDING:

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस होणार सक्रिय, विदर्भाला अलर्ट

Last Updated:

30 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. पूर्व विदर्भाकडून राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार असून 30 ऑगस्टसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र पाहायला मिळालं. कोकणमध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील तुरळक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. 30 ऑगस्टपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. पूर्व विदर्भाकडून राज्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार असून 30 ऑगस्टसाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. पाहूयात 30 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.

advertisement

मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह अधूनमधून 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे तर मुंबईतील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळू शकते.

advertisement

सोलापुरात लसूण 400 रुपये प्रति किलो, आणखी दर वाढणार?, व्यापारी काय म्हणाले?, VIDEO

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्‍यता नाकारता येत नाही. उर्वरित कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची कुठलीही शक्यता नाही. तर उत्तर महाराष्ट्रातील केवळ जळगाव या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

advertisement

सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, बाजार विश्लेषकांनी सांगितली नेमकी काय आहेत यामागची कारणे, VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना 30 ऑगस्टसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस होणार सक्रिय, विदर्भाला अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल