सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा व्हिडीओ 25 जुलैरोजी दुपारी 2 वाजून 14 मिनिटं आणि 35 सेकंदाचा आहे. ज्यामध्ये यशश्री हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ हा आरोपी दाऊद शेखचा आहे. हा व्हिडीओ दुपारी 2 वाजून 22 मिनिटांचा आहे. दहा मिनिटांनंतर त्याने यशश्रीचा पाठलाग सुरू केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
advertisement
दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान दाऊद शेख याला आज कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्नाटकच्या शाहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा येथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेख याला घेऊन नवी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जात आहे. दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.