कार्यालयात पोहोचताच संशय
बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात Learjet कोसळल्यानंतर काही तासांतच AAIBचे अधिकारी दिल्लीतील महिपालपूर येथील VSR Aviation कार्यालयात दाखल झाले. मात्र तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परिसरात याआधी दिसलेले काही लोक अचानक नजरच येईनासे झाले.
‘सहकार्य करा, काही होणार नाही’
कार्यालयाच्या गेटवर तपास पथकाने एका सुरक्षारक्षकाची चौकशी केली. ओळख पटवण्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड मागण्यात आले. “सहकार्य केलंत, तर काहीही होणार नाही,” असे एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे The Indian Expressने नमूद केले आहे. मात्र सुरक्षारक्षकाने परिसरातील गायब व्यक्तींविषयी माहिती नसल्याचे सांगत, आपल्याला कुटुंबाची जबाबदारी असल्याचे वारंवार सांगितले.
advertisement
AAIBचे अधिकारी सकाळी सुमारे 11.30 वाजता परिसरात पोहोचले होते. काही मिनिटांतच The Indian Expressची टीम तिथे पोहोचली, तेव्हा चौकशी सुरूच होती.
बंद खोल्या, वाढता संशय
तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी कार्यालयाशी जोडलेला असावा असा संशय असलेल्या बेसमेंटच्या दरवाजाची तपासणी केली. तो दरवाजा आतून बंद असल्याचे आढळल्यावर, कोणीही आत नसेल तर दरवाजा आतून कसा बंद? असा सवाल एका अधिकाऱ्याने उपस्थित केला, असे अहवालात म्हटले आहे.
यानंतर AAIBचे पथक सुमारे 12.15 वाजेपर्यंत आपल्या अधिकृत वाहनात थांबले. त्यानंतर VSR Venturesशी संबंधित एक व्यक्ती तिथे आली आणि कार्यालय उघडले. एका अधिकाऱ्याने ओळख पटवणारी लॅनयार्ड काढून आत प्रवेश केल्याचेही वृत्त आहे. काही वेळाने बाहेरून शटर बंद करण्यात आले आणि आत चर्चा केली.
अपघाताबाबत आतापर्यंत काय माहिती?
फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, हे Learjet सुमारे 35 मिनिटे हवेत होते आणि बारामतीजवळ रडारवरून गायब झाले. DGCAच्या प्राथमिक माहितीनुसार, विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला.
Flightradar24च्या डेटाचा हवाला देत The Indian Expressने म्हटले आहे की, VT-SSK नोंदणीचे Learjet 45 सकाळी सुमारे 8.10 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण झाले. बारामतीच्या रनवेवर अलाईनमेंटसाठी वळण घेतल्यानंतर, सुमारे 8.45 वाजता विमान ट्रॅकिंग सिस्टीमवरून गायब झाले.
विमान आणि कंपनीची पार्श्वभूमी
Bombardier Aerospaceने तयार केलेले Learjet 45 हे मध्यम आकाराचे बिझनेस जेट असून, 1995 ते 2012 दरम्यान जगभरात सुमारे 640 विमाने तयार करण्यात आली. हे नऊ आसनी विमान VSR Aviationच्या ताफ्यात होते. DGCAच्या नोंदींनुसार, VSRकडे एकूण 18 विमानांचा फ्लीट आहे.
कंपनी VSR Ventures आणि VSR Aero Engineeringमार्फत कार्यरत असून, विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे संचालक म्हणून नोंदणीकृत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दोघेही मूळचे प्रशिक्षित पायलट आहेत.
चौकशीचा पुढचा टप्पा
अपघाताची तीव्रता पाहता या प्रकरणाची मुख्य चौकशी AAIBकडूनच केली जाणार आहे. फ्लाइट डेटा, विमानाच्या देखभाल नोंदी, ऑपरेशनल पद्धती आणि निर्णयप्रक्रिया या सगळ्या बाबी तपासल्या जाणार आहेत. ऑपरेटरच्या कार्यालयात तातडीने सुरू झालेली चौकशी पाहता तपासाचा फोकस आता अपघातस्थळापलीकडे थेट कंपनीच्या कार्यपद्धतीकडे वळल्याचे स्पष्ट होते.
