TRENDING:

साध्वीचा संशयास्पद मृत्यू, 4 तासांच्या आत तिच्याच सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट, हे कसं शक्य? समोर आलं सत्य

Last Updated:

राजस्थानमधील जोधपूरमध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे, ज्यामुळे संपूर्ण आध्यात्मिक विश्व आणि सोशल मीडिया युजर्स सुन्न झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियाच्या आजच्या जगात, एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व हे केवळ प्रत्यक्ष आयुष्यातच नाही, तर डिजिटल पडद्यावरही तितकंच प्रभावी असतं. आपण रोज सकाळी उठल्यावर आपल्या लाडक्या कलाकारांच्या किंवा मार्गदर्शकांच्या पोस्ट पाहतो, त्यांच्या विचारांनी प्रेरित होतो. पण विचार करा, एखाद्या व्यक्तीच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरते आणि त्यानंतर काही तासांतच त्याच व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक सूचक पोस्ट येते... तेव्हा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. एखादा मृत व्यक्ती कसाकाय पोस्ट करु शकतो. त्याची अंतिम इच्छा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट होणं हे थोडं संशयास्पद वाटतं.
साध्वी प्रेम बाईसा
साध्वी प्रेम बाईसा
advertisement

राजस्थानमधील जोधपूरमध्ये सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे, ज्यामुळे संपूर्ण आध्यात्मिक विश्व आणि सोशल मीडिया युजर्स सुन्न झाले आहेत. प्रसिद्ध साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे आणि मृत्यूच्या 4 तासानंतर एका इन्स्टाग्राम पोस्टने या प्रकरणाला एक गूढ वळण दिलं आहे.

जोधपूरच्या आध्यात्मिक वर्तुळात आदराने नाव घेतलं जाणाऱ्या साध्वी प्रेम बाईसा यांचा 29 जानेवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला. त्या सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय होत्या आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण त्यांच्या निधनानंतर जे काही घडलं, त्याने पोलिसांचीही झोप उडवली आहे.

advertisement

नेमकं काय घडलं?

साध्वींच्या वडिलांनी आणि गुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, साध्वींना गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप होता. उपचार म्हणून एका कंपाउंडरला आश्रमात बोलावण्यात आलं होतं. या कंपाउंडरने साध्वींना एक इंजेक्शन दिलं आणि अवघ्या 5मिनिटांतच साध्वींनी प्राण सोडले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या कंपाउंडरला ताब्यात घेतलं, इंजेक्शनचं रिकामं पाकीट आणि वैद्यकीय साहित्य जप्त केलं आहे.

advertisement

साध्वींचा मृत्यू संध्याकाळी 5 च्या सुमारास झाला, असं सांगितलं जातंय. पण खरा गोंधळ उडाला तो रात्री 9 च्या सुमारास, जेव्हा त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून एक लांबलचक पोस्ट प्रसिद्ध झाली. एखाद्या 'सुसाईड नोट'सारखी वाटणारी ही पोस्ट वाचून चाहते हादरले.

त्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?

"मी माझं आयुष्य सनातन धर्माच्या प्रचारासाठी अर्पण केलं... पण प्रकृतीला काय मान्य होतं? मी या जगाचा कायमचा निरोप (ओळ अधुरी)... पण मला विश्वास आहे की, माझ्या जिवंतपणी नाही तर किमान मेल्यानंतर तरी मला न्याय मिळेल." साधवीच्या निधनानंतर 4 तासांनी 'न्याय' मागणारी ही पोस्ट कोणी केली? हा प्रश्न पोलिसांसमोर मोठा उभा राहिला.

advertisement

साध्वी प्रेम बाईसा

साध्वींच्या वडिलांनी सांगितली 'इन्साइड स्टोरी'

साध्वींचे वडील आणि गुरू वीरम नाथ यांनी या पोस्टमागचं गूढ उकललं आहे. त्यांनी सांगितलं की, साध्वी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत असताना त्यांनीच एका सहकारी गुरुमहाराजांना आपल्या मोबाईलमधून हा मेसेज पोस्ट करायला सांगितला होता. ही पोस्ट साध्वींच्या मोबाईलवरूनच झाली होती, पण ती त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या व्यक्तीने केली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी हेल्दी, घरच्या घरी बनवा पालक कटलेट रेसिपी, संपूर्ण Video
सर्व पहा

जोधपूर पोलीस कमिशनर ओमप्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण आता अत्यंत बारकाईने तपासलं जातंय. इंजेक्शन दिल्यावर 5 मिनिटांत मृत्यू होण्याचं कारण काय? (Allergic reaction की चुकीचं औषध?) पोस्टमध्ये साध्वींनी 'न्यायाची' भाषा का वापरली? त्यांना कोणापासून धोका होता का? 'अग्निपरीक्षेसाठी' त्यांनी शंकराचार्यांना पत्र का लिहिलं होतं? या सगळ्याप्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/देश/
साध्वीचा संशयास्पद मृत्यू, 4 तासांच्या आत तिच्याच सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट, हे कसं शक्य? समोर आलं सत्य
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल