लंडन जाणारे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेताच अवघ्या 10 मिनिटातच विमान कोसळलं. 12 सेकंदात विमान जमिनीवर आदळले आणि काही सेकंदातच ते आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. अपघातस्थळी धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
Plane Crash: जगातील 5 भयानक विमान अपघात, 11 हजार प्रवाशांचा गेला जीव
या विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, 30 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
advertisement
विमानाचा अपघात का झाला?
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाचा मागील भाग हा जवळील इमारतीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले, ज्यामुळे हा अपघात झाला. विमानात 242 लोक होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे हे विमान लंडनला रवाना झाले होते. अपघातस्थळी धुराचे लोळ दिसून आले.
अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. अमित शहा यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.