TRENDING:

Air India Plane Crash: विमान अपघाताचं गूढ उकलणार, 16 तासांनंतर पहिला Black Box सापडला

Last Updated:

Boeing787 Air India Plane Crash: हे विमान टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटांत कोसळलं. यामुळे प्रचंड नुकसान झालं. इंजिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती. आता हाती लागलेल्या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं नेमकं कारण समोर येऊ शकेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद: अहमदाबाद इथे झालेल्या AI171 विमान अपघाताबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विमान अपघातानंतर तब्बल 16 तासांनंतर पहिला ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. तर दुसरा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 12 जून रोजी दुपारी 1.38 मिनिटांनी एअर इंडियाचं विमान AI171 अपघातग्रस्त झालं. या विमान अपघातामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. 241 प्रवासी क्रू मेंबर्स असे मिळून 265 जण असल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

हे विमान टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटांत कोसळलं. यामुळे प्रचंड नुकसान झालं. इंजिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती. आता हाती लागलेल्या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं नेमकं कारण समोर येऊ शकेल. अद्याप दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. हे विमान हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं, त्यात तिथल्या 27 जणांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे. टेकऑफच्या वेळी कॉन्फिगरेशन एरर म्हणजे विमानाच्या सेटिंग्जमधील त्रुटी आल्यामुळे अपघात झाला की नाही ते आता चेक केलं जाईल.

advertisement

दोन दिवसांपूर्वी नोकरी सोडली, लंडनला सेटल व्हायच्या आधीच नियती क्रुर झाली, विमान अपघातात कुटुंबाची स्वप्नही क्रॅश

ब्लॅक बॉक्स साधारणता चॉकलेटी-नारंगी रंगाचा असतो. अपघातग्रस्त ठिकाणाहून तो ओळखता येतो. या दोन ब्लॅक बॉक्समध्ये कॉकपिटमधील संपूर्ण डेटा सेव्ह होत असतो. कॅप्टननं कोणती कमांड दिली, इतकंच नाही तर विमानाच्या बाहेरील बाजूस काही घडत असेल तर त्याचेही आवाज रेकॉर्ड होतात. Flight Data Recorder (FDR) - इथं इंजिन, वेग, उंची, फ्लॅप्स, ब्रेकिंग आणि इतर जवळपास 88–1000+ नोंदी घेतल्या जातात. दुसरं म्हणजे Cockpit Voice Recorder (CVR) – यामध्ये पायलटांमध्ये, ATC किंवा इतर आवाजांचे अंतिम 2 ते 25 तासांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असतो. या दोन्हीच्या मदतीनं शेवटच्या 5 मिनिटांत काय घडलं याची नोंद घेता येते.

advertisement

आग, पाणी, पाऊस, वारा, अगदी मिसाइलने जरी विमान क्रॅश झालं तरीसुद्धा ब्लॅक बॉक्स मात्र सेफ राहातो. इतकं मजबूत तो तयार केलेला आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटाला काहीच होत नाही. हा संपूर्ण डेटा विमानासोबत काय घडलं याची कहाणी सांगतो. क्रॅशचं कारण सांगतो, त्यामुळे विमान अपघातात हा खूप महत्त्वाचा रोल बजावत असतो.

Vijay Rupani : लकी नंबर 1206 विजय रुपाणींसाठी ठरला Unlucky, आजची तारीख आणि सीट क्रमांक दोन्ही ठरले प्राणघातक

advertisement

विमानात 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. डीजीसीएने जाहीर केलेल्या प्रवाशांच्या यादीत 13 मुले आणि 89 महिलांची नावे आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानात होते. त्यांचा शेवटचा फोटोही समोर आला आहे. डीजीसीएने जाहीर केलेल्या प्रवाशांच्या यादीत विजय रुपाणी यांची सीट 12 व्या क्रमांकावर दाखवण्यात आली होती.

advertisement

त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की ते त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. अपघातात त्यांचा मृत्यू भाजप आणि देशाच्या राजकारणासाठी मोठा धक्का आहे. मेघनगरमध्ये एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीला धडकले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजची आहे. ज्या वेळी विमान इमारतीला धडकले तेव्हा वरच्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये अनेक वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash: विमान अपघाताचं गूढ उकलणार, 16 तासांनंतर पहिला Black Box सापडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल