TRENDING:

Air India Plane Crash : मोठी बातमी! अपघातग्रस्त विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री?

Last Updated:

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या AI-171 विमानाचा अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : अहमदाबाद विमानतळाजवळ भीषण अपघात झाला आहे. लंडनला 242 प्रवाशांसह उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाचे विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. आज मध्यान्हाच्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. मात्र, अवघ्या 10 मिनिटातच विमान कोसळून अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या AI-171 विमानाचा अपघात झाला. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण विमान अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
Air India Plane Crash
Air India Plane Crash
advertisement

अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच विमान कोसळले. अहमदाबाद विमानतळावर उड्डाणादरम्यान अपघात झाला असल्याची माहिती समोर आली. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रवासी विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील मेघानी परिसरात हा विमान अपघात झाल्याची माहिती आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानातून प्रवास करत असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्याबाबत फारसी माहिती समोर आली नाही. प्राथमिक माहिती नुसार जवळपास 40 हून अधिक प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

advertisement

टेक ऑफ करताच कोसळले विमान ...

एअर इंडियाच्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर जवळच्या इमारतीला हे विमान धडकले. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विमान कोसळल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाला आणि धुराचे लोळ उठले. तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानासह स्थानिकांनीदेखील मदत कार्य सुरू केले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash : मोठी बातमी! अपघातग्रस्त विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल