Plane Crash : ब्रेकिंग न्यूज ! अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह लंडनला जाणारे Air India चे विमान कोसळले,
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ahmedabad Plance Crash : अहमदाबाद विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. एअर इंडियाचे हे विमान असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 133 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे.
अहमदाबाद: अहमदाबाद विमानतळावर मोठा अपघात झाला आहे. एअर इंडियाचे हे विमान असल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये 242 प्रवासी असल्याचे म्हटले जात आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे हे विमान होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच विमान कोसळले.
अहमदाबाद विमानतळावर उड्डाणादरम्यान अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रवासी विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती आहे. अहमदाबादमधील घोडाकॅम्प मेघानी परिसरात हा विमान अपघात झाल्याची माहिती आहे.
133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, गुजरातच्या अहमदाबादधील घटना #Gujarat #marathinews #plancrash pic.twitter.com/VWcqnrgiEX
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2025
advertisement
अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी झाले.
#AhmedabadPlaneCrashes : A tragic plane crash has occurred in #Ahmedabad‘s Meghani Nagar area.
Reports suggest around 200 people have lost their lives. Emergency services are at the site. More details awaited.#Gujarat #planecrash @Bhupendrapbjp pic.twitter.com/nIlTe0h29D
— Arya (@aaaryakpkp) June 12, 2025
advertisement
समोर हाती आलेल्या माहितीनुसार, 40 जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमान अपघातात जीवितहानी झाल्याची माहिती तूर्तास समोर आली नाही. मात्र, विमानाचा झालेला भीषण अपघात पाहता या विमान अपघातात काही जीवितहानी होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात..
Location :
Ahmedabad (Ahmedabad) [Ahmedabad],Ahmedabad,Gujarat
First Published :
June 12, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Plane Crash : ब्रेकिंग न्यूज ! अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह लंडनला जाणारे Air India चे विमान कोसळले,