TRENDING:

Amit Shah In Lok Sabha : दहशतवाद्यांच्या रायफल विमानाने चंदिगडला पाठवल्या, रात्रभर गोळीबार, पहाटे 4.46 ला Video Call, शाहांनी घटनाक्रम सांगितला...

Last Updated:

Amit Shah In Lok Sabha : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. त्याबाबत शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. या चकमकीपासून ते आज पहाटेपर्यंतचा आजचा घटनाक्रम अमित शाह यांनी सभागृहाला सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर' वर संसदेत चर्चा झाली. आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेत सहभाग घेण्याआधी अमित शाह यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव' मोहिमेची माहिती दिली. सुरक्षा दलाच्या जवानांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. त्याबाबत शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. या चकमकीपासून ते आज पहाटेपर्यंतचा आजचा घटनाक्रम अमित शाह यांनी सभागृहाला सांगितला.
Amit Shah (AI Image)
Amit Shah (AI Image)
advertisement

अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, सोमवारी झालेल्या या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. ही कारवाई लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू पोलिसांनी केली. भाषणादरम्यान गृहमंत्री अमित शहा म्हणाले की पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले. या तिन्ही दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली होती.

अमित शहा म्हणाले की पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच 22 मे रोजीच ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले. 23 एप्रिल रोजी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत देशाबाहेर जाऊ दिले जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला. गुप्तचर अधिकारी या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी टेकड्यांवर फिरत राहिले. त्यानंतर सेन्सर्सद्वारे त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि 28 जुलै रोजी त्यांचा खात्मा करण्यात आला.

advertisement

दहशतवाद्यांची ओळख पटवली...

एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांना ओळख पटवण्यासाठी आणण्यात आले. त्यांनीच या दहशतवाद्यांना ओळखले. मात्र, पहलगामच्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही इतरही मदत घेतली. आम्ही अनेक तांत्रिक मदत घेतली आणि या दहशतवाद्यांना ओळखले असल्याचे शाह यांनी म्हटले.

पहाटेच्या सुमारास व्हिडीओ कॉल...

अमित शाह यांनी म्हटले की, हे पहलगामचे गुन्हेगार आहेत का, याची खात्री करण्यासाठी या दहशतवाद्यांच्या रायफल्स विशेष विमानाने चंदिगडमध्ये पाठवण्यात आले. त्या ठिकाणी रायफलमधून फायरिंग करून बुलेट्ची फॉरेंसिक चाचणी केली. पहलगामध्ये झाडल्या गेलेल्या गोळ्यांची फॉरेन्सिक चाचणी आधीच केली होती. त्यानंतर दोन्ही अहवाल जुळून पाहिले. त्यानंतर सहा तज्ज्ञांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. या 6 तज्ज्ञांसोबत मी पहाटे 4.46 वाजता व्हिडीओ कॉलवर चर्चा केली असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

advertisement

शाह यांनी सांगितले की, लष्कर आणि टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर आम्ही या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला. एनआयएने तीन हजार तासांहून अधिक काळ 1055 लोकांची चौकशी केली. याचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यानंतर त्यांचे स्केच बनवण्यात आले. त्यानंतर एका बशीरची ओळख पटली. या दहशतवाद्यांनी सांगितले की 21 एप्रिल रोजी तीन दहशतवादी आले होते. त्यांच्याकडे एके 47 आणि कार्बाइन होते. तीन पाकिस्तानी दहशतवादी, एके 47 आणि एम-9 कार्बाइन वापरले गेले. दोन स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांना मदत केली. त्या सर्वांना पकडण्यात आले असल्याची माहिती शाह यांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Amit Shah In Lok Sabha : दहशतवाद्यांच्या रायफल विमानाने चंदिगडला पाठवल्या, रात्रभर गोळीबार, पहाटे 4.46 ला Video Call, शाहांनी घटनाक्रम सांगितला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल