कोण होणार किंगमेकर?
गेल्या महिनाभरापासून बिहारमध्ये त प्रचाराचा धुरळा उडाला असून सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच राहाव्यात यासाठी एनडीए आणि महागठबंधन प्रयत्नशील आहे. . आज मतदानाचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळपर्यंत मतदानाची वेळ आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा असून, एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत होत आहे.
बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला
advertisement
पहिल्या टप्प्यात 64.66 टक्के मतदान झाले, जे बिहारच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. 74.2 दशलक्ष मतदारांपैकी 39.2 दशलक्ष पुरुष आणि 3.35 दशलक्ष महिला आहेत. बिहारमध्ये कोणता पक्ष किती जागा जिंकेल? याबद्दलचे सर्व अंदाज आज संध्याकाळी सर्व न्यूज 18 प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये उपलब्ध असणार आहे.
कोणाकोणाचे पोल येणार?
अॅक्सिस माय इंडिया, जन की बात आणि टुडेज चाणक्य यासारख्या सर्व प्रमुख एजन्सी अंदाज जाहीर करतील. एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी, प्रत्येक पक्ष त्यांच्या स्वतःच्या सर्वेक्षणांचा आणि बूथ अहवालांचा आढावा घेत आहे. बिहारच्या निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. भाजप-जेडीयू,लोजपा ही एनडीएचा भाग आहे. तर आरजेडी, काँग्रेस, वीआयपी आणि भाकप याची महाआघाडी एकत्र निवडणूक लढवत आहे.
कुठे पाहता येणार पोल : https://news18marathi.com/
बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो व्यतिरिक्त १४ सभा घेतल्या. राहुल यांनी एकूण १५ सभा घेतल्या. काही महिन्यांपूर्वी १५ दिवस चाललेल्या ‘मतदार अधिकार यात्रे’चे नेतृत्व त्यांनी केले होते. तत्पूर्वी बिहारमध्ये काही दिवस तळ ठोकून शहा यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. या शिवाय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनीही पहिल्यांदाच बिहारमध्ये प्रचार केला. त्यांनी १० सभा आणि एक रोड शो करून जोरदार प्रचार केला. तर या निवडणुकीचा ‘एक्स फॅक्टर’ मानल्या जाणाऱ्या जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी घरोघरी प्रचारावर भर दिला होता.
