मिळालेल्या माहितीनुसार, विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर अचानक कमी झाल्यामुळे इंजिनने काम करणे बंद केलं. हवेत असताना इंजिन बंद पडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आणि पहाटे ०६:४० वाजता विमानतळावर Full Emergency घोषित करण्यात आली. वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान सुरक्षितपणे पुन्हा दिल्लीत उतरवण्यात आले. विमानातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, कोणालाही इजा झालेली नाही. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
advertisement
या घटनेनंतर एअर इंडियाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. "तांत्रिक बिघाडामुळे आमच्या वैमानिकांनी प्रमाणित संचालन प्रक्रियेनुसार (SOP) विमान दिल्लीला परत नेण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. विमानाच्या तांत्रिक तपासणीचे काम सुरू असून, प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे," असं एअरलाइनने म्हटले आहे.
